आयुष्यात अनेक प्रसंग येतात. अनेक भाषांचा व्यवहारात उपयोग करावा लागतो.पण मायबोली विसरुन आपणाला चालणार नाही .आपणच जर मराठीचा प्रसार वा उपयोग केला नाही तर मग कोण आपल्या भाषेचा उद्धार करणार? आपण मायबोलीला विसरुन कदापि चालणार नाही.मी मराठी बाणा आता दाखवायला हवा...


If you are passionately in love with Marathi poetry, as a writer or a reader, this is your group.Please post your poems, the poems that you like, qoutations about poetry and your views and thoghts about Marathi poetry...

पुन्हा ढग दाटून येतात. पुन्हा आठवणी जाग्या होतात . तिचे माझे सारेच पावसाले. माझ्या मनात भिजून जातात, पुन्हा पाउस ओला ओला. पुन्हा पाउस बांधून झुला, तिच्याकड़ले उरले झोके. परत करतो माझे मला. पुन्हा पाउस खुप ऐकतो. पुन्हा पाउस खुप बोलतो तिच्या माझ्या गप्पान्मधले तिचे थेंब हळूच झेलातो. पुन्हा पावसाला सांगतो मी. पुन्हा पावसाशी बोलतो मी माझे तिचे आठवण थेंब . पुन्हा पावसाला मागतो मी.............

i carry your heart with me(i carry it inmy heart)i am never without it(anywherei go you go,my dear; and whatever is doneby only me is your doing,my darling)i fearno fate(for you are my fate,my sweet)i wantno world(for beautiful you are my world,my true)and it's you are whatever a moon has always meantand whatever a sun will always sing is youhere is the deepest secret nobody knows(here is the root of the root and the bud of the budand the sky of the sky of a tree called life;which growshigher than the soul can hope or mind can hide)and this is the wonder that's keeping the stars aparti carry your heart(i carry it in my heart) .....

विरह ....

विरह या शब्दात कीती दुरावा आहे तु मला सोडल हाच या गोष्टीला पुरावा आहे....

मनातही मन गुंतुन जात जेव्हा मनातल्या आठवणी मन आठवत राहत ते मनालाही कळत नाही।।

शेवटी accept केलं आम्ही, नशीबाची आहे चालच तिरकी प्रेमासारख्या नाजुक बाबतीत ही दैवाने आमची घेतली फिरकी लग्नानंतर दोन वर्षांनी मग रस्त्यात नवऱ्याबरोबर ती भेटली हसायलाही पैसे पडतात ह्याची आम्हाला खात्रीच पटली....

वाटलं आता आयुष्यातलं सगळं काही सरलं आवडणा-या मैत्रिणीचं लग्न जेव्हा ठरलं म्हणाली, चांगल्या नवऱ्यासाठी नवस करायला गेलो होतो चांगला नवराच हवा होता तर आम्ही काय मेलो होतो ?

क्षितीजापलीकडॆ पाहण्याची दॄष्टी असेल तर क्षितीज नक्की गाठता यॆत ... आपल्या रक्तातच धमक असॆल तर जगंही जिंकता यॆत ...

धुक्यात सजली दवात भिजली, सोनरेशमी सकाल तू, हवाहवासा मला वाटतो तो स्वप्नाचा सूकाल तू, तूच प्रेरणा तूच साधना उपासना या प्रेमाची तू , तूज्यासाठी जीवन माजे या जगन्याला कारण फक्त तू....!!!!


काही माणसे ही गजबजलेल्या शहरासारखी असतात, गरज काही पडली तरच आपला विचार करतात, बाकीच्या वेळी ति सारी नाती विसरतात काही हवे असेल स्वतःला तर तुम्हाला मित्र मित्र करतात....


इथे सारेच यात्री मीच वनवासी आहे इथे सारेच प्रतिसादी मीच अभिलाशी आहे सारेच तड्पतात इथे ज्या अमुल्य आसवांसाठी मी कोण, मी त्या आसवांचा जुना प्रवासी आहे....

इथे सारेच कलाकार मी कोण आहे माझी किमंत काय कोणला जाण आहे सारेच बहरलेत इथे हिरवळीत हिरव्या मी कोण, सुकलेलं एक पिपंळ पान आहे...

जसं जगावं वाटतं तसंच जगून बघितलं पाहिजे आपण करावंसं वाटेल ते करायचं जगावंसं वाटेल तसं जगायचं..


ह्रुदयाची स्पंदने आज वाढली, का त्याच्या प्रेमात मी प्रांजळ स्वप्ने पाहीली, अस्तित्वाचे भान न राहीले, म्रुगजळाकडे मी धावत होते, स्वप्नांना नव्हता त्याचा गंध, मी त्याच्यात का हरवले होते, माझ्या अस्तित्वाचे लेणे भंगुन, त्यालाच सावरले होते...








मैत्री अशीच आहे कायम मनात जपण्यासारखी

एकामेकांना भॆट्ण्य़ाची दोघानाही आस आहे आपल्या मैत्रीमध्ये हीच एक गोष्ट फ़क्त खास आहे इन्द्र्धनुष्याचे रंग आहेत आणि पारिजातकाचा वास आहे आपल्या मैत्रीमध्ये बरेच काही खास आहे मी म्हणजे जीवन आणि तु म्हणजे श्वास आहे आपल्या मैत्रीमध्ये बरेच काही खास आहे संकटांची नाही भिती, तुझ्या मैत्रीचा विश्वास आहे आपल्या मैत्रीमध्ये बरेच काही खास आहे कधी वाटते फक्त तुझी मैत्री सच्ची, बाकी दुनिया नुसता आभास आहे आपल्या मैत्रीमध्ये बरेच काही खास आहे हवे काय अजुनि त्याला, मित्र तुझ्यासम ज्यास आहे आपल्या मैत्रीमध्ये बरेच काही खास आहे...

प्रेमा मधले गणित सोडवले आहे मी, सुखा मधे दुःखाला पण जोडले आहे मी, तो नाही म्हटल्यावर आज गणित पुर्ण झाले, कारण बाकी काहीच नाही तसे उरले...

माझ्या ह्रुदयाची स्पंदने त्याला का समजली नाही? घेतला जो मी दिर्घ श्वास का त्याला जानवला नाही? माझ्या सरणावर वाहीलेली फ़ुले का त्याने पाहीली नाही? मी सोडुन गेल्यावर त्याला,माझी किम्मतही का समजली नाही?






स्मशानात जाताना माझ मन समाधानी होत, माझ प्रेम आज धन्य झाल होत, माझ्या अंत यात्रेत जेव्हा मी त्याला पाहील होत, खोट-खोट का असेना त्याच्या डोळ्यात पाणी दाटल होत...



माझ्या पासुन तो नेहमीच नजर चोरतो, कॉलेज मधे भेटल्यावर दुसऱ्या मुलिशी बोलतो, झुलॉजीच्या लेक्चरला तो बायोचा अभ्यास करतो, असा मति मंद मुलगा तो माझ्यावर चोरुन प्रेम करतो नेहमीच त्याच्या चुकांतुन पकडला जातो. ...



अशी एक सकाळ हवी-ज्या वेळी तु सोबत असावा, सुर्याची किरणे बनुन-तु माझ्या शरीराला दिपवावस, पाण्याची निरव शांतता बनुन-मला रीझवावस, वाऱ्याची झुळुक बनुन-मला शहारावावस.






कधी कधी ओळख अलगदपणे मैत्रीमध्ये बदलते, गप्पा रंगतात, वादही होतात, नवे नाते उमलते.... गाण्याची एखादी मैफल जशी उत्तरोत्तर रंगत जाते, तशीच ही मैत्री आयुष्याला संगीतमय करत राहते.... अशा मैत्रीला नियमांचे अन अटींचे बंध नसतात, चेहरे दिसले नाही तरी मनं मात्र नक्की दिसतात.... आपली मैत्री अशीच आहे कायम मनात जपण्यासारखी, चिरकाळ आनंद देणाऱ्या गोड सुरेल गाण्यासारखी..............



ह्रुदयाची स्पंदने आज वाढली, का त्याच्या प्रेमात मी प्रांजळ स्वप्ने पाहीली, अस्तित्वाचे भान न राहीले, म्रुगजळाकडे मी धावत होते, स्वप्नांना नव्हता त्याचा गंध, मी त्याच्यात का हरवले होते, माझ्या अस्तित्वाचे लेणे भंगुन, त्यालाच सावरले होते

पुन्हा ढग दाटून येतात.

गहीवरल्या मनाला माझा निरोप आहे, झालेल्या जखमांना माझा निरोप आहे, शब्दांनाही माझा आज निरोप आहे, माझ्या अखंड साहित्याला आज माझा कायमचा निरोप आहे....

माझ्या कविता आता रोज मला भेटतात भरभरुन त्याच्या बद्दल लिहितात प्रेमात दुखावलेल्या माझ्या मनाला दिलास देतात तुम्हाला सांगु आता त्यापण माझ्याशी खुप सलगिने वागतात ...

पुन्हा ढग दाटून येतात. पुन्हा आठवणी जाग्या होतात . तिचे माझे सारेच पावसाले. माझ्या मनात भिजून जातात, पुन्हा पाउस ओला ओला. पुन्हा पाउस बांधून झुला, तिच्याकड़ले उरले झोके. परत करतो माझे मला. पुन्हा पाउस खुप ऐकतो. पुन्हा पाउस खुप बोलतो तिच्या माझ्या गप्पान्मधले तिचे थेंब हळूच झेलातो. पुन्हा पावसाला सांगतो मी. पुन्हा पावसाशी बोलतो मी माझे तिचे आठवण थेंब . पुन्हा पावसाला मागतो मी.............


विविधतेत सौंदर्य असतं ऐकदा तुच असं म्हणालीस, मी नजर “दुसरीकडे” वळवल्यावर तु किती रागावलीस ?

कधी असतो स्वार्थ तर कधी असतो अर्थ होते जीवन सार्थ तर कधी वाटते व्यर्थ कधी मिलते प्रेम तर कधी होते उपेक्षा पण तरीही आयुष्यात प्रत्येक क्षणाची साक्षीदार अपेक्षा...!

स्वप्नांत का होइना पण..

धपाटा मारण्यासाठी का होईना पण वाटतं की आई जवळ हवी होती अन दरवाज्यातल्या मोटारीपेक्षा वाटतं की जुनी सायकलच बरी होती....

प्रेमात पडणं सोपं असतं पण प्रेम निभवणं कठीण असतं हातात हात घेऊन चालणं सोपं असतं पण तोच हात आयुष्यभर हातात घेऊन पाऊलवाट शोधणं कठीण असतं...

गुलाबी थंडी, नेहमीच त्याला आवडायची, माझ्या कुशित शिरायला, तिच एक निमित्त असायची....


त्याच्या लग्नाची आज मला पत्रिका मिळाली, तिथेच माझ्या स्वप्नांची संपुष्टी झाली, माझी स्वप्ने तिथेच मोडली, काय सांगु तुम्हाला इथेच मी संपली. ...

कधी कधी ओळख अलगदपणे मैत्रीमध्ये बदलते, गप्पा रंगतात, वादही होतात, नवे नाते उमलते.... गाण्याची एखादी मैफल जशी उत्तरोत्तर रंगत जाते, तशीच ही मैत्री आयुष्याला संगीतमय करत राहते....


निदान एकवार त्याने मला पहावं, दुःखी माझ्या मनाला एकवार रुझवाव, स्वप्नांत का होइना पण.. पुन्हा एकदा त्याने मला मिठित घ्यावं.....

माझ लिखान हेच माझ आता प्रेम आहे...

आमच्या प्रेमाच्या साक्षिला सुरुच्या बागा होत्या, समुद्राच्या ठिकाणी जाणाऱ्या नागमोडी वाटा होत्या, मंदिरातली अबोल देवाची मुर्ति होती, न पाहीलेलि अशी दुरवर विसावलेली आमची मने होती....

खरचं प्रेमात मी खुप काही हरवल आहे, माझं शिक्षण-माझी नोकरी, सुखाचे दिवस सोनेरी, उरली फ़क्त चारोळीच्या रुपातुन मिळणारी शांती...!!!

त्याच्या येण्याची आजही मला आस आहे, खर सांगु तुम्हाला त्याची आठवणच खुप खास आहे, त्याच्या निःशब्द रुपाचीच काय बात आहे, त्याच्या समोर आता माझ्या सारख्या हजारोंची रास आहे...

चेहरा तुझा आठवला तेव्हा पाहिले मी चंद्राला, डोळे तुझे आठवले अन पाहिले मी चाँदन्यांन्ना, ओठाची तुझ्या आठवण आली मी गुलाबाची पाकळी पाहिली, अशी ही तुझी तहान मी कशीबशी भागवली......


कविता करताना काही शब्द नकळत खाली सांडले,
सांडलेल्य शब्दांना मी फकतं सरळ रांगेत मांडले..

त्यातले दोघे अचानक एकमेकांशी भांडले,
अन जागा बदलून स्वताःची त्यानीच सुंदर यमक साधले !!


हल्ली तुला पाहिल्याशिवाय मला करमतच नाही, डोळ्यांनी बोलल्याशिवाय राहावतच नाही, मन माझे तुझ्याकडे येऊ पाहते आहे, पण रागवले आहे ते माझ्यावर, मी त्याला पाठवतच नाही...



माझी कविता-हीच माझी आजची ओळख आहे……. तो. त्याच्या वर लिहिणे म्हणजे, शब्दांना नित्य-नवा साज आहे, माझ्या आयुष्याचा तोच महत्वाचा भाग आहे... तुम्हाला सांगण्या सारख तस काहि नाहि, पण बेभान माझ्या आयुष्याला तोच एक लगाम आहे... माझ लिखान हेच माझ आता प्रेम आहे, त्याने दिलेल्या जखमांवरच तेच उरलेला व्रण आहे... बहरलेल्या झाडाला पान गळतीचा तो शाप आहे, माती मधे विरुन गेलेला तो पावसाचा पहिलाच थेंब आहे... माझ्या प्रत्येक दुःखाला तोच जबाबदार आहे, पण तुम्हाला खरे सांगु, अजुनहि माझे त्याच्यावर मनापासुन प्रेम आहे ........

तुझ्या माझ्यातील विरहानंतर

त्याच्या साठि आज शब्दांना बोलते केले, कधि पासुन घुसमटले होते, ते आज त्याच्या आठवणिने बोलते झाले, चारोळ्यांच्या रुपात...

तुझ्या सहवासातला प्रत्येक क्षण, मी डोळ्यात जपलाय, तुझ्या माझ्यातील विरहानंतर, त्यानेच मला रिझवलाय...

तुझ्यावरती लिहिन म्हणजे, शब्दाना नित्य नवे आव्हान आहे, वर्तमानातुन मला मागे यावे लागते, कारण तसे करणे मला भाग आहे....


कोण म्हणत प्रेम नश्वर आहे, माझ्या कोमेजलेला चेहेरा पहा, मग कळेल ते किती शाश्वत आहे ...

तुझ्या विरहामध्ये प्रत्येक क्षण, अगदि युगासारखा वाटतो, एकदा अनुभवून बघ मला, रात्रच काय दिवसहि तसाच जातो...


गळलेल्या पानांमधून दिसू लागल्येत विरळ झालेली नाती,
एकाच झाडावर पिलांनी माझ्या बांधल्येत वेगवेगळी घरटी..
आपला संसार थाटण्यासाठी नेहमीच असाव्यात उंच आपल्या आशा,
परी घेताना भरारी पिल्लांनो माझ्या विसरु नका परतीची दिशा..
आम्हासवेच असावे अशी नाही अपेक्षा, परी मिळुन मिसळून रहावे एवढीच आमची इच्छा!




मीठी

मीठी या शब्दात किती मिठास आहे नुस्ताच उच्चार्ला की कृति चा भास आहे...

हरविलेले काव्य शब्द अचानक कधीतरी सापडतात, अपलेच शब्द वेचताना नकळत पापण्या भिजवतात..

रंगवताना आठवणी सारे पानच गेले रंगुन , गालावरचे आसू ओघळतांना गेले चित्रातील शब्द भिजवून !

नवे चार शब्द रोजचं मला भेटतात , बोलता बोलता आणिक चारजणांना जमवतात.. जुळून आलेले सूर सुरेल मैफीली भरवतात, सांजवेळी परतीच्या नव्या चारोळी घडवतात.

मानसापेक्षा पावसाच छान आहे, दुखाने बरसताना देखील, त्याला निसर्ग फुलावायाच भान आहे...