एकामेकांना भॆट्ण्य़ाची दोघानाही आस आहे आपल्या मैत्रीमध्ये हीच एक गोष्ट फ़क्त खास आहे इन्द्र्धनुष्याचे रंग आहेत आणि पारिजातकाचा वास आहे आपल्या मैत्रीमध्ये बरेच काही खास आहे मी म्हणजे जीवन आणि तु म्हणजे श्वास आहे आपल्या मैत्रीमध्ये बरेच काही खास आहे संकटांची नाही भिती, तुझ्या मैत्रीचा विश्वास आहे आपल्या मैत्रीमध्ये बरेच काही खास आहे कधी वाटते फक्त तुझी मैत्री सच्ची, बाकी दुनिया नुसता आभास आहे आपल्या मैत्रीमध्ये बरेच काही खास आहे हवे काय अजुनि त्याला, मित्र तुझ्यासम ज्यास आहे आपल्या मैत्रीमध्ये बरेच काही खास आहे...
प्रेमा मधले गणित सोडवले आहे मी, सुखा मधे दुःखाला पण जोडले आहे मी, तो नाही म्हटल्यावर आज गणित पुर्ण झाले, कारण बाकी काहीच नाही तसे उरले...
माझ्या ह्रुदयाची स्पंदने त्याला का समजली नाही? घेतला जो मी दिर्घ श्वास का त्याला जानवला नाही? माझ्या सरणावर वाहीलेली फ़ुले का त्याने पाहीली नाही? मी सोडुन गेल्यावर त्याला,माझी किम्मतही का समजली नाही?
स्मशानात जाताना माझ मन समाधानी होत, माझ प्रेम आज धन्य झाल होत, माझ्या अंत यात्रेत जेव्हा मी त्याला पाहील होत, खोट-खोट का असेना त्याच्या डोळ्यात पाणी दाटल होत...
माझ्या पासुन तो नेहमीच नजर चोरतो, कॉलेज मधे भेटल्यावर दुसऱ्या मुलिशी बोलतो, झुलॉजीच्या लेक्चरला तो बायोचा अभ्यास करतो, असा मति मंद मुलगा तो माझ्यावर चोरुन प्रेम करतो नेहमीच त्याच्या चुकांतुन पकडला जातो. ...
कधी कधी ओळख अलगदपणे मैत्रीमध्ये बदलते, गप्पा रंगतात, वादही होतात, नवे नाते उमलते.... गाण्याची एखादी मैफल जशी उत्तरोत्तर रंगत जाते, तशीच ही मैत्री आयुष्याला संगीतमय करत राहते.... अशा मैत्रीला नियमांचे अन अटींचे बंध नसतात, चेहरे दिसले नाही तरी मनं मात्र नक्की दिसतात.... आपली मैत्री अशीच आहे कायम मनात जपण्यासारखी, चिरकाळ आनंद देणाऱ्या गोड सुरेल गाण्यासारखी..............