सकाळी दार उघडलं आणि खिळून राहिले.
उजळलेलं आकाश आणि डोंगरांची रांग.
रात्री आले, तो वळणं घेत येणारा डांबरी रस्ता स्वच्छ दिसत होता. त्याच्या दोन्ही
बाजूंनी डोंगरापर्यंत पोचलेली हिरवी झाडं. काही गुच्छागुच्छांनी उभी तर काही
एकएकटी. मध्ये सगळीकडे पसरलेलं पिवळं गवत... गुडघाभर उंचीचं असणार. झुडपंही वाळून
गेलेली. पण हिवाळ्याच्या गेल्या दोन महिन्यांत गवतात जो लालसरपणा दिसत होता, तो
उन्हाळ्याच्या चाहुलीनं वितळला होता. मध्यंतरी एकदा असंच फिरतीवर असताना सलग काही
दिवस हा व्हॅन गॉगच्या चित्रांमधला लालसर पिवळा रंग पाहून पाहून डोकं भणाणून गेलं
होतं. डोळे दुखायचे. वाटायचं, महिनाभर या गवतासोबत राहण्याची वेळ आली, तर मी नक्की
वेडी होणार. आता बदल होताहेत हे पाहून डोळे निवळले.
मधल्या पठारांवर लहान लहान
वाड्या दिसत होत्या. मधून नदी वाहत असावी असा अंदाज येत होता, पण पाणी दिसत नव्हतं.
बारीक धार असावी. कातकऱ्यांची काही सुटी सुटी घरं दिसत होती. दारू गाळण्यासाठी
नदीकाठ सोयीचा. आणि महादेव कोळ्यांप्रमाणे येथील कातकऱ्यांकडे स्वतःचा काही
जमीनजुमला नाही, असं महावीर सांगत होता रात्री. एका घरातून पहिला धुराचा लोट उठला.
चूल पेटली असणार.
हळूहळू मला समोर कागद असल्याचा भास होऊ लागला.
बोटांमध्ये
शिरशिरी उठली.
जलरंगांच्या छटा शुभ्र बशीमध्ये तयार होऊ लागल्या. रंगाचा एकेक पातळ हलका थर
कागदावर उमटू लागला.
ही आकाशाच्या फिकट निळेपणापासून उजळ सुरुवात.
ढगांच्या
पांढुरक्या तुकड्यांच्या जागी ब्रश अलगद उचलून कागद तसाच पांढरा सोडून द्यायला
हवा.
मग डोंगरावरच्या मातकट लाटा.
यलो ऑकर, इंडियन रेड, सॅप ग्रीन, सेपिया...
रंगांची नावंही आठवू लागली. किती वर्षांनी.
रस्ता ओलांडून रंग अलीकडे येतायेता
मध्येच एका उंच पर्णहीन झाडावर तीन भलेमोठे तुरे होते... एखाद्या उत्सवाच्या
सजवलेल्या काठ्या असाव्यात तसे फुलांनी माखलेले. फिकट जांभळी फुलं. पांढऱ्यासोबत
थोडा जांभळा, थोडा लाल, मधूनच जाणवेल न जाणवेल अशी निळी छटा.
रंगांचे थर वळत वळत
कागदाच्या खालच्या उजव्या टोकाकडे आले. थांबले.
समोर पायरीजवळच्या कुंडीत एक मोठं लालस पान दोन नव्या पानांना वाढू देण्यासाठी
अंग मुडपून घेऊन बसलं होतं. नव्या कोवळ्या पानांचा पारदर्शकपणा अजून गेला नव्हता,
त्यांतून प्रकाश पाझरत होता.
चहूबाजूंना पाहिलं. किती चित्रं! कधीच संपणार नाहीत
कितीही जणांनी रंगवली तरी.म्हटलं, आता दुसरा कागद घ्यावा...
If you are passionately in love with Marathi poetry, as a writer or a reader, this is your group.Please post your poems, the poems that you like, qoutations about poetry and your views and thoghts about Marathi poetry...
पुन्हा ढग दाटून येतात. पुन्हा आठवणी जाग्या होतात . तिचे माझे सारेच पावसाले. माझ्या मनात भिजून जातात, पुन्हा पाउस ओला ओला. पुन्हा पाउस बांधून झुला, तिच्याकड़ले उरले झोके. परत करतो माझे मला. पुन्हा पाउस खुप ऐकतो. पुन्हा पाउस खुप बोलतो तिच्या माझ्या गप्पान्मधले तिचे थेंब हळूच झेलातो. पुन्हा पावसाला सांगतो मी. पुन्हा पावसाशी बोलतो मी माझे तिचे आठवण थेंब . पुन्हा पावसाला मागतो मी.............
i carry your heart with me(i carry it inmy heart)i am never without it(anywherei go you go,my dear; and whatever is doneby only me is your doing,my darling)i fearno fate(for you are my fate,my sweet)i wantno world(for beautiful you are my world,my true)and it's you are whatever a moon has always meantand whatever a sun will always sing is youhere is the deepest secret nobody knows(here is the root of the root and the bud of the budand the sky of the sky of a tree called life;which growshigher than the soul can hope or mind can hide)and this is the wonder that's keeping the stars aparti carry your heart(i carry it in my heart) .....
One Poem